SAFE & AFFORDABLE HOUSING FOR WOMEN

A daughter, a sister, a friend, a wife, a mother. Such myriad roles does a woman play! Although, this shouldn't be all that defines her because she is, above all, an individual who deserves respect, love, gratitude and most importantly, independence.

Despite being considered a valuable part of society, a lack of financial independence is still evident in women. Even today, she is rarely asked how she wants to live her life, what she expects to achieve, what are her dreams. The time is ripe to move one step ahead and think about women as individuals and help them be self-reliant. And what better way for women to gain independence than having a house to call their own!

But, even though women in India are revered as 'ghar ki laxmi' buying a house for themselves isn't easy in this country. The road to women buying a house is fraught with numerous restrictions, archaic laws and financial obstacles. Hence germinated the idea of HERHIGHNEST” - an affordable housing scheme exclusively for women. “HERHIGHNEST” will be a self-contained apartment complex with a well-stocked mess, a crest, an amphitheatre, an open garden and a club house which will include a fully-equipped gym.

The Idea behind

The idea behind this project is to empower women, for them to have a home of their own, thus helping them create their own identity.

As a woman, the task of trying to buy a house in this country is quite overwhelming. Completing banking formalities and managing finances can be quite daunting. Mere determination and perseverance isn’t enough to overcome the several hurdles that come in the way of finally owning your dream home. A project like “HERHIGHNEST”,earmarked exclusively for women would go a long way in making this dream a reality.

Vision

To provide women with safe and affordable housing options.

Mission

We believe that safe and affordable housing should be a right for all women. At HERHIGHNEST, we are committed to maintaining superlative quality standards and will endeavour to transform women's lives by fulfilling their dream of having a house of their own.

लहानगी पोर पाहता पाहता रमून जाते 'घर घर' खेळण्यामध्ये. तिला भेट म्हणून दिलेल्या खेळण्यांत असतात भारंभार बाहुल्या, खेळण्यातला छोटा संसार... भातुकलीची भांडीकुंडी. तिच्या त्या खेळातल्या लुटुपुटुच्या चुलींवर ती चढवते लुटुपुटीची भांडी. त्यात लुटुपुटीचा डाळ भात रांधत राहते. मोठं होऊन आपलंही असंच एक खरोखरीचं घर असणार याची खात्रीच असते तिला.

आई-बाबांच्या घरी खेळता-बागडताना ती पाहते मोठ्ठं होण्याची स्वप्नं. इर्ष्येने झगडते सारं काही मिळविण्यासाठी. मनापासून शिकते, आवडीच्या विषयांत सर्वस्व ओतते. आपल्या पायांवर उभं राहताना, आत्मनिर्भर होत असताना आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न ती फार क्वचित पाहते. आई-बाबाचं घर तेच आपलं घर....खात्रीच असते तिला.

आवडता जोडीदार मिळाल्यानंतर ती आनंदाने ओलांडते एक नवा उंबरठा. तिला वाटतं आता हे नवं घर सजवू आपल्या मनासारखं. हौसैने जमवत राहते एक एक गोष्ट..स्वप्नाळूपणे भिरभिरत राहते नव्या घरात. नोकरीवरून दगदग करून घराच्या ओढीने तिथेच परतत राहते. आईकडून शिकलेले पदार्थ मुलांसाठी कौतुकाने बनवत राहते. कुटुंबातल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याने कष्टत राहते. सगळ्यांच्या इच्छा जपत, सर्वस्व विसरून संसार उभारत राहते. सासरचं घर तेच आपलं घर...खात्रीच असते तिला.

पण इतका जीव लावतोय त्या घराचा एक कोपरा तरी खरोखरीच आपला आहे का हा प्रश्न अलीकडे मनात डोकावतो तिच्या. माहेर आई-बाबांचं, सासर नवर्याचं...मग आपलं घर कुठे आहे... तिला आताशा वाटत राहतं. नव्या वस्तू, नवी रंगरंगोटी..नव्या सुखसोयींवर मनसोक्त खर्च करतो आपण. मग हक्काच्या चार भिंतींत काही पैसे गुंतवावेत असं कधीच का नाही वाटलं.....ती अधूनमधून का होईना, पण विचारते स्वत:ला. कष्टाने काड्या काड्या जोडून बनवलेल्या आपल्या या घरट्यात कधी चुकून वादळ घुसलं तर….? कुणी दुखावलं...निघून जा म्हणालं तर...? एकटं रहावं लागलं तर…? पिलं उडून गेल्यानंतर जीव लावणारं जवळ काहीच नसलं तर? सगळं छान असूनही कधी उदास वाटलं तर? आपल्या भविष्याचा भक्कम आधार बनेल अशी भक्कम गुंतवणूक हाताशी नसली तर? आताशा हेही प्रश्न पडू लागलेत तिला.

म्हणून तिला मिळायला हवा तिच्या हक्काचा अवकाश. एक असं घर, जिथे ती खर्या अर्थाने असेल आपल्या आयुष्याची साम्राज्ञी. तिचं नाव लिहिलेली दारावरची पाटी तिच्या पावलांना दर वेळी आधार देईल. एक असं घर जे तिला कधीच अव्हेरणार नाही. 'यात तुझं काहीच नाही' असं कधीच म्हणणार नाही. सतत कशा न कशासाठी कष्टणार्या तिच्यासाठी हे घर बनून राहील एक विसाव्याची जागा. हे घर असेल तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा. त्याच्या भरभक्कम छपराखाली तिला जगता येईल अगदी स्वच्छंद, मनमोकळं, निश्चिंत. झटकून टाकता येईल मनाच्या तळाशी जपलेल्या इच्छांवरची धूळ. आयुष्याच्या संध्याकाळी हे घर तिच्यासाठी बनेल म्हातारपणाची काठी....तिच्या चिमुरडीच्या उद्यासाठी बनेल एक हक्काचा सुरक्षित कोपरा. भातुकलीतला नव्हे...खराखुरा. अनिश्चिततेचा वारा या भिंतींना शिवणार नाही. मातीमध्ये घट्ट रुजलेली या घराची मूळं तिच्या पंखांना देतील उंच भरारी घेण्याचं बळ... आणि दिवसभर कष्टून, जगण्याशी झुंजून परतताना हे घर मायेने तिच्यासाठी आपली दारं उघडेल. म्हणेल, ''बस इथे अशी खिडकीशी निवांत.... हे सारं तुझंच आहे आहे. या भिंती, हे छप्पर, इथला कोपरान् कोपरा खरोखरच तुझा आहे.. आणि या खिडकीतून दिसणारं सारं आभाळही तुझंच आहे.

Follow Our Youtube Channel

Our Sites

Contact us by filling the following form

Mandatory information is marked with *

This website uses cookies to ensure you get the best experience on our website. Learn more